नमस्कार मराठी ब्लॉग पाहुन वाचून माझेही हात शिवशिवू लागले. आपणही पांढऱ्यावर काळे केलेले येथे टाकावे. (विं.दां.ची क्षमा मागुन ’लिहिणाऱ्याने लिहित जावे वाचणाऱ्याने वाचित जावे वाचत वाचता एक दिवस लिहिणाऱ्याचे हात घ्यावेत')
पंधरा सोळा वर्षांपूर्वीची गोष्ट.पुण्यात शाळांची संख्या मर्यादित होती. आजच्या सारख्य़ा international schools चे पेव फुटले नव्हते.त्यामुळे English Medium शाळांची चलती होती. अशा शाळेत ज्य़ूनियर के.जी.त प्रवेश मिळविणे कठीण होते.(पुण्यातील नामांकित मराठी माध्यमांच्या शाळांमध्येही प्रवेश मिळविणे मुश्कील होते.) माझ्या मुलीला शाळेत प्रवेश घेताना आलेल्या अनुभवाचे हे कथन.
पाठशाळा प्रवेश समास
बहुत शाळांसी स्वये जावे काहिंचे फॉर्म आणावे
आन्यांच्या चौकशीस जावे लेकुरांसाठी
सायंकाळी शाळेसी जावे रांगा लवोनी उभे रहावे
रात्र रात्र तिष्ठावे फॉर्मसाठी
आलस्य अवघा दवडावा यत्न उदंड करावा
धनसंचय वढवावा डोनेशनार्थ
नाना विषय वाचावे बहुत पालकांसी भेटावे
बालमानस आभ्यासावे मुलाखती कारणे
ऑफीस विषय विसरावा नाट्य विषय टाळावा
अखंड ध्यास धरावा प्रवेशाचा
मुलाखतीसी स्वये जावे नेमके उत्तर बोलवे
उलट उत्तर टाळावे वरीष्ठांसी
इतुके करीतही झालसी नापास
न होई हताश यत्न करी
कित्येक करती टिंगली कित्येक करती टवाळी
बडबडती बाष्कळी न मिळता प्रवेश
जिल्हा परिषद गाठावी नगरपरिषद धुंडावी
पादत्राणे झिजवावि सर्वकाळ
ओळ्ख वशीले पाद्यपूजन खेळावे राजकारण
अन्य नसावे व्यवधान प्रवेशाविना
पदवी,नोकरी अथवा लग्न याहुनीही अनंत विघ्न
प्रवेश मिळणे कर्मकठीण बालमंदिरी
इतिश्री उदासबोधे गुरुशिष्य संवादे पाठशाळा प्रवेश समाप्त
10 comments:
अभिनंदन!
ब्लोगविश्वात स्वागत असो. लिहीत रहा.
Good..Keep it up..Wish you all the Best
I read your page with correcting shudhalekhan. Now U may use it as open diary.
Your poem is expressive.
Shubhanji...this type of writing you are good at. You go quite close to the new marathi poet (his name I can't recollect, I think his name is Sandeep).
Shubhangee : You are aware that I am all the time busy & no time for giving/spending time for own liking things , Which I am learning from you as I have realised that there is no end to any ambition.But you have more pleasure in things which you like more.
All of us have gone through this. Congratulations for Blog. Keep writting.
Shubharambha...chan ahe...Avadala..
Dear Shubha
First of all congratulations !
As Ramesh has written, most of us are running after some thing, 'WHAT', none of us knows and are busy all the time.We all need to seriously change this.
Please keep writing. This will inspire at least a few to look at life differently !
All the best.
Sanjeev
gr8 mom keep it up
शुभांगीकाकू छान वाटले फार तुमचा ब्लॉग वाचून. अंतरंगातील नाट्यछटा तर केवळ अप्रतिम.
Post a Comment