तीन वर्षापूर्वी पहिल्यांदा अमेरीकेत येणे झाले. मैत्रेयीच्या पदवीदान समारंभाला विसा न मिळल्याने येता आले नव्हते. पण तिला नोकरी मिळल्यावर आम्ही तिच्याकडे आलो. तिची नोकरी नवी ,तिला ते राज्य नवीन,सगळे अपरिचित म्हणून तिला सोबत म्हणुन आम्ही आलो, तरीही तिने आम्हाला इकडे भरपूर हिंडवले. 2024 च्या अखेरीस माझी सेवानिवृत्ती झाली आणि मैत्रेयीचे लग्न झाले आणि तिकडच्या काही अपरिहार्य कारणांनी तिला दिड वर्षे होऊनही भारतात येणे झाले नाही आणि परत कधी येता येईल हे ही सांगता येणार नाही अशी परिस्थिती असल्याने तिने तुम्हीच या असा आग्रह करायला सुरुवात केली, आम्हालाही वेळच वेळ आहे त्यामुळे सात जुन ला तिच्याकडे आलो.
मैत्रेयीला ऑफिसमधे काम होतेच शिवाय तिला कुठलासा कोर्स करायला सांगितले असल्याने तिला मदत आणि तिचा सहवास हाच या भेटीचा मुख्य उद्देश्य. तरीपण आमचे राहणे सुखकर होईल व नवीन बघणे होईल अशा पध्दतीने त्यांनी वेळाचे व सुट्ट्यांचे नियोजन केले. मैत्रेयीचा ऑफिसमधील एक सहकारी इशान याचे आई-बाबा मागील वेळी भेटले होते व त्यांच्या सोबत आम्ही गेल्या वेळी एक ट्रीप केली होती. यंदा पण ते अमेरिकेत आलेत व आमच्याबरोबर सहल करायची असे त्यांनी मैत्रुला सांगुन ठेवले होते.
हिल्सबरोपासुन जवळ
माउंट हेलेन्सला जायचे ठरवले. शनिवारी सकाळी नऊला जायचे ठरवले होते. आम्ही घरुन इडली
आणि दोन प्रकारच्या चटण्या घेतल्या होत्या. दोन आडीचतासाचा प्रवास होता. रस्ते फारच
सुंदर आणि प्रशस्त असल्याने प्रवासाचा आनंद मिळतो. ओरेगन राज्य निसर्गरम्य आहे. चहुबाजुंनी
दाट वनराई डोळे थंडावत होती. पोर्टलंड गुलाबाचे शहर ओळखले जात असल्याने.गावातुन बाहेर
पडताना रस्त्याच्या कडेनेही गुलाबाची बने. प्रवासच एवढा सुखकर तर मुक्कामचे स्थान किती सुंदर असेल असं वाटत होतं. आता चढणीचा रस्ता
सुरु झाला. घाट असला तरी दुपदरी रस्ता होता व वाहनांची खुप गर्दी नव्हती. एका ठिकणी
थांबलॊ. तिथे माऊंट हेलेन्स बद्दल माहितीपट दाखविला जाणार होता. दर अर्ध्या तासांनी
हा माहितीपट दाखविला जातो. तो मोफत होता. 1980 मध्ये या पर्वतातुन अचानक मातीचा ज्वालामुखी
( Mud volcano) झाला, त्याबदद्ल्ची साद्यंत माहिती या पटात अत्यंत रोचक रितीने दाखवली होती. 1980 मध्ये
तिकडे काहीतरी भयंकर घडणार असल्याचे हवामान खात्याने वर्तवले होते,तिथल्या स्थानिक
रहिवाश्यांना विस्थापनाचा इशारा देण्यात आला होता. काही वृध्द हलले नाही आणि खरोखरीच
त्या पर्वताच्या पोटात घडमोडी होऊन मातीचे खलन सुरु झाले.धुळीचे लोट्च्या लोट सुटले
हि माती हजारॊ किमी. ऊडली प्रचंड नैसर्गिक विपत्ती झाली. तिथले सगळी नैसर्गिक संपत्ती
नष्ट झाली.पण नंतर निर्सगाला त्याचा वेळ देण्यात आला. तिथे नैसर्गिक रित्या पुन्हा
सृष्टी जागी झाली आणि नंतर पर्यावरण प्रेमींनी तेथे पुन्हा भरपूर वृक्षारोपण झाले आणि
आता तेथे पुन्हा भरपूर वनराजी दिसते मात्र
पर्वत ती आपत्तीची जखम आपल्या शिरावर बाळगुन आहे.
त्या इमारतीत त्या आपत्तीतील झाडांचे अवशेष ठेवलेत.त्या ठिकाणच्या
वृक्षांची ,पक्षांचे,प्राण्यांचे फोटॊ,मॉडेल्स आहेत. प्रत्येक प्रकारच्या पक्षांच्या घरट्यांची मॉडेल्स, त्यांची माहिती
मिळाली. तिकडे वेगवेगळ्या शास्त्रीय संकल्पना कारटुन्सच्या ऍनिमेशन फिल्म मधुन सांगितल्या
आहेत. अतिशय सोप्या आणि रसाळ भाषेत या संकल्पना दाखवल्यात. तसेच जंगलाशी संबंधित खेळ
लहान मुलांसाठी ठेवलेत. लहान मुलांवर निसर्गाचे, निसर्गाच्या साधनसंप्पत्तीचे संवर्धन
करण्याचे संस्कार करणारे ते खेळ आणि फिल्म्स मला सगळ्यात आवडले. त्या इमारतीच्या बाहेर
आरामात बसायला भरपूर जागा , खुर्च्या होत्या रेलींगला टेकुन उभे राहिलो कि समोर हेलेन्स
पर्वतराज उभे होते. या पर्वतावर जायला ट्रेकिंग करावे लागते,ते काम तितके
सहज अर्थातच नाही.
तिकडुन आम्ही पुढे गेलो, एक अतिशय सुंदर तळे होते, त्याच्या काठी
बसायला बाक होते, तिथे बसुन आम्ही जेवण केले. इशान च्या आईने गट्ट्यांची
भाजी भात आणला होता. राजस्थानी व दाक्षिणत्य जेवणाचा आस्वाद घेतला. तळ्यामधे लोक बोटींग
करत होते. इकडे सहा महिने दिवस लहान असतो, चार वाजताच अंधार पडतॊ शिवाय सकाळी
आठ वाजेपर्यंत उजाडत नाही. त्यामुळे समर अर्थात उन्हाळ्याची इकडचे लोक वाट बघत असतात, उन्हाळ्यात दिवस
मोठा असतो, पहाटे पाच पासून रात्री नऊ पर्यंत सूर्यदेवाचा मुक्काम अस्मानी असतो त्यामुळे हे
तीन चार महिने इकडचे लोक उन्हाळा सर्वार्थाने भोगतात ! अगदी लहान लहान मुले ,तरुण पाण्यात
पोहत होते आणि सिनियर सिटीझन्स(म्हातारे कोतारे म्हणणं त्यांना आवडत नाही म्हणून...)
हि किमान कपड्यात बोटींग करताना दिसत होते. आम्ही तळ्याभोवती हिंडुन गप्पागोष्टी करत
फोटो काढले. परत यायला निघलो.
घरी आलो तेंव्हा पाच
वाजायला आले होते तरी सूर्य अजून खूपच वर होता. दिवसभर हिंडून जराही थकावट जाणवली नाही.
आमच्या अमेरिका वारीची सुरुवात अशा बहारदार सहलीने झाली !
.jpg)

No comments:
Post a Comment