Thursday, October 22, 2020

भ्रमनिरास

 

नाव: पद्मशीला तिरपुडे
जिल्हा: भंडारा. 
खलबत्ते, वरवंटे विकून संसार व मुलाला सांभाळून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून शिक्षण घेऊन MPSC ची PSI ची परीक्षा पास करणारी ही मुलगी आहे.
💐 सलाम तिच्या मेहनतीला 💐

WhatsApp वर हि बातमी फिरतीय.  या मुलीचा फोटोही झळकतोयं. खरोखरीच या मुलीच्या जिद्दीचे,परिश्रमाचे कौतुक करावे तेवढे थोडेच. आजच्या चंगळवादी जगात तर या मुलीचे कष्ट जास्तच उठून दिसतात. हि मुलगी सरकारी नोकरीत रुजु झाली त्यातही पोलीस खात्यात गेली आहे हे वाचल्यावर मात्र तिला नोकरीत कशा अनुभवांना तोंड द्यावे लागेल याचं चित्र उभं राहीलं आणि त्याचच हे कल्पनाचित्र. तिचे  अनुभव  असेच असतील असे नाही, किंबहुना ते असे नसावेतच तरीही.....


जातीने मी पाथरवट

दगड धोंड्यांना देते घाट

खल बत्ता पाटा वरवंटा

बनवायाला हवा देह धट्टाकट्टा

देहाहुनही  कणखर मन

घेतल त्यानं मनावर

फोडून टाकीन दारिद्र्याला

दिस सुखाचं दावीन लेकराला

केली एक दिस अन् रात

अभ्यास करुन झाले पास

गेले कराया नोकरी सरकारी

म्हटल संपवेन इथली गुंडगिरी

पाहुन  कारभार इथला सारा

वाटे व्यवस्थेहुन  पाषाण बरा

फोडुन  दगड केल्या जिनसा

विकुन मिळे घामाचा पैसा

इथल्या राबण्यात नाही घाम

उठता लाचारी बसता सलाम

देवा कशाला दिली परीक्षा

चांगल्या कामाला मिळे रे शिक्षा

चोर फिरती मोकळे मस्त

आम्ही बंदोबस्तात अखंड व्यस्त

राहायचे इथे टिकुन तर आवर रडं

मारुन मनाला बन दगड

सौ.शुभांगी राव

19 comments:

Pradip Chaudhari said...

Very nice.
After a long time.
Pl continue to write n share

Ramesh Rao said...

वास्तववादी चित्रण

Sujata said...

Nice
hopefully she gets job Satisfaction

Unknown said...

Reality. May God give her strength to overcome and succeed.

Unknown said...

Sunil Upasani

Asawari Kulkarni said...

अगदी वास्तववादी चित्र उभं केलंस अन ते ही बोचणाऱ्या शब्दांत!
खूप संताप होतो हे सगळं बघून, पण उम्मीद पे दुनिया कायम है 🤗

अशोक बापट said...

कवितेत पद्मशीलाच्या गतायुष्यातील दारूण संघर्षाची संवेदनशील जाण आहे. वर्तमानातील यशाचे कौतुक आहे. सध्या समाज ज्या दिशेने चालला आहे ते बघता तिच्या भविष्यातील जीवनाबदल रास्त काळजी आहे. आणि सर्व चपखल शब्दांत मांडले आहे. कविता आवडली.

Atul Sule said...

अतिसुंदर कविता..अतिशय स़वेदनवशील मनाचे प्रकटीकरण! कवयित्रीची चिंता रास्त परंतु पोलिस खात्यात ही काही किरण बेदी असतातच.

Unknown said...

Very perfect poem witb apt contents. Really appreciate such genuine creativity.

Unknown said...

Nicely penned . Apt description of today's sad reality . I just wish her hard work pays back .

Unknown said...

From Dilip Mundada

Unknown said...

हे कटू सत्य आहे, पण बदल घडवायला कोणीतरी एक पाऊल पुढे टाकायला पाहिजे

Unknown said...

ही व्यथा सौ शुभांगी राव यांनी फारच कळकळीने शब्दात व्यक्त केली आहे.
जयंत खेर

Dilip Tanaji Kale said...



सौ.शुभांगी राव
मित्र रमेश राव याच्या पत्नीने लिहिलेली कविता. अशी वेळ या युवतीवर ना येवो व स्त्री शक्ति चा जागर व महिषासुरमर्दिनी असे तिचे रूप व्यवस्थेने तिला पूर्ण मुभा देवून सुप्त गुण प्रकट होवोत. अशी आशा.

Unknown said...

Sooper imagination. Very nice poem. Convey my hearty congratulations to shubhangi waini.🌹🌹👌👌

Unknown said...

Sooper imagination. Very nice poem. Convey my hearty congratulations to shubhangi waini.🌹🌹👌👌
Shobha Sripathi

Unknown said...

देव करो आणि लाल फितीतल्या माणुसपण विसरून वागणार्‍या निर्ढावलेल्यांसारखे वागायची बुद्धि तिला न होवो.

shekharkulkarni said...

खूपच छान... ज्यांनी हे दगडी खलबत्ते करताना बघितलेत, त्यांनाच यातील भावना समजतील,़़ बाकी पाषाण...

Anilji agashe said...

भ्रमनिरास, यात, खुपच वास्तव सत्य सांगितलं आहे, खुपच छान व मार्गदर्शक